धामणगाव रेल्वे : वर्धा नदीतील गोकुळसरा घाटातून दररोज रात्री १५ ट्रकद्वारे ५० ब्रास रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असून, तालुका प्रशासन मौन धरून आहे. आतापर्यंत आठ हजार ब्रासपेक्षा अधिक रेतीची तस्करी या घाटातून झाली आहे. याबाबत जिल्हा महसूल प्रशासन करते तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात वर्धा नदीच्या पात्रात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर, कासारखेड, चिंचोली, विटाळा हे रेतीघाट येतात. या घाटात दर पावसाळ्यात हजारो ब्रास रेती जमा होते. मात्र, उन्हाळ्यात हे पात्र मोठं मोठे खड्डे दिसते. नेमके या पत्रातील रेती जाते कुठे, याविषयी महसूल प्रशासनाला माहीत नाही का, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.
हजारो ब्रास रेतीची जबाबदारी स्वीकारणार कोण?
तालुक्यातील आष्टा, वकनाथ, बोरगाव निस्ताने, चिंचोली, विटाळा या मोठ्या रेतीघाटातील वाळू दरवर्षी लिलाव न करता बेपत्ता होते. याची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्न या भागातील ग्रामस्थांनी निर्माण केला आहे.
जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज गोकुळसरा घाटातून दररोज रेतीची तस्करी होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत मिळाल्यानंतरही आतापर्यंत एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घाटाला सरप्राईज व्हिजीट दिली नाही. एकीकडे शासनाच्या महसूल तिजोरीत वाढ व्हावी, यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न होत असताना जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
ज्या रेतीघाटाचा लिलाव झाला नाही, त्या घाटातून रेतीची चोरी होऊ नये म्हणून महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येते. आतापर्यंत अनेक रेती तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे रेती तस्करी झाली, तर भरारी पथकाला जबाबदार धरले जाईल.
– तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे
…. गोकुळसरा घाटातून आठ हजार ब्रास रेती तस्करांच्या घशात, जिल्हा प्रशासन करते तरी काय? रोज रात्रीला १५ ट्रक रेतीची वाहतूक गोकुळसरा घाटातून दररोज तस्करी
पावसाळ्यातपुरामुळे सर्वाधिक रेती गोकुळसरा घाटात जमा झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रशासन व्यस्त झाल्याने या घाटातून रेती तस्करीचे प्रकार वाढले. रात्रीला १५ ते २० ट्रक रेतीची अवैधपणे वाहतूक रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत होत आहे. ही गंभीर बाब महसूल तालुका प्रशासनाच्या लक्षात येऊनही प्रशासन मौन धरून आहे.