प्रतिनिधी
जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था ह्या सक्षम नाहीत बऱ्याचश्या सेवा सहकारी संस्थे जवळ जागा आहे परंतु बांधकामास निधी नाही या सर्व सेवा सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभासद संस्था आहेत व त्या संस्था मधूनच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर व बाजार समितीवर प्रतिनिधी निवडून जातात परंतु या संस्थावर कुणाचेही लक्ष नाही बऱ्याच संस्थाचे कार्यालय अध्यक्षांच्या घरीच आहे संस्थेची मीटिंग घेण्याकरिता जागा नाही व टेबल खुर्च्या सुद्धा नाहीत मीटिंगचा खर्च करण्याकरिता पैसे देखील नाहीत सदर संस्थांना सचिवांचा पगार सुद्धा देणे परवडत नाही अशा प्रकारची बिकट परिस्थिती संस्थांवर आहे ज्या ज्या सहकारी संस्थेवर स्वतःची जागा उपलब्ध आहे त्या त्या सहकारी संस्थेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने व कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःच्या उत्पन्नातून मदत केल्यास यांनी संस्था स्वतःचे कार्यालय बांधू शकतात बऱ्याचशा संस्थांना मीटिंग घेण्याकरिता कार्यालय नसल्यामुळे टेबल खुर्च्या नाहीत व रेकॉर्ड ठेवण्याकरिता कपाटाची सुद्धा व्यवस्था नाही तेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बाजार समितीने या सर्व संस्थांना मदत करणे आवश्यक आहे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक व अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सर्व प्रकारच्या संस्थांना मदत करीत असते अकोला बाजार समितीने ज्या संस्थे जवळ स्वतःची जागा आहे त्या संस्थांना बांधकामाकरिता चाळीस हजार रुपये अनुदान व प्रत्येक संस्थेला एक टेबल एक कपाट तेरा खुर्च्या दिलेल्या आहेत तसेच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा आर्थिक मदत केली आहे तेव्हा प्रामुख्याने अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी स्वतः लक्ष घालून व जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती यांनी सुद्धा या बाबीकडे लक्ष घालून मदत केल्यास ह्या संस्था सक्षम करता येतील त्यावर लक्ष देऊन आर्थिक मदत करावी अशी विनंती गोकुल पाटील भडांगे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी जसापुर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे