दसरा , मांडवसीला यात्रा भरे घनदाट! आम्हा सांगे कृष्णनाथ, भक्ती करा होईन भेट !! 

0
92
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 ७२ फूट उंच झेंड्याना खोळ चढवली जाणार, कापुराच्या ज्वाळातून भक्तीचा प्रकाश

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत दसरा यात्रा महोत्सव 

चांदुर रेल्वे:- तालुक्यातील जगप्रसिद्ध कापुराची यात्रा म्हणून ख्याती असलेल्या पं पूज्य कृष्णाजी ऊर्फ अवधूत महाराजांचे श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत यंदा दसरा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता “चंदनउटी व रमणा” सोहळा पार पडणार असून दुपारी ४ वाजता श्रीकृष्ण अवधूत महाराजांचे ७२ फुट उंच दोन झेंडे चढविण्याचा नेत्रदीपक व चित्तथरारक सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर, सावंगा (विठोबा) यांच्या शुभहस्ते व लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडणार असून भजनाच्या गजरात कापुराची प्रज्वलन करून हा पारंपरिक कार्यक्रम संपन्न होईल.

भाविक भक्तांच्या सोयीसाठी अमरावती व चांदुर रेल्वे येथून विशेष यात्रा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान समितीच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवानंतर संस्थानच्या वतीने ६ ऑक्टोबर २०२५, सोमवार रोजी कोजागरी पौर्णिमा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, रात्री १२ वाजता कोजागरी प्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानने केले आहे.

यासोबतच दरवर्षीप्रमाणे ७ ऑक्टोबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दैनंदिन पहाटे ५ ते ७ या वेळेत काकडा कार्यक्रम सुरू राहणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी संस्थान तर्फे नाश्ता व चहाची व्यवस्था केली आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी आदींनी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने केले आहे.

veer nayak

Google Ad