शासनाच्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली . राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने धामणगाव तहसील कार्यालय येथे आज २१ जुलै रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले,या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे. या कायद्यामधील तरतुदी ह्या लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्काची पायमल्ली होणार आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम शासनाच्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आहे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, निवेदन देतो वेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत जी गावंडे, तालुकाअध्यक्ष पंकज वानखडे, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मुंदडा, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंदू डहाणे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निमकर ,माजी शहराध्यक्ष नितीन कनोजिया, तालुका उपाध्यक्ष मुकेश राठी, हेमंत कडू, सुनील भोगे, मुकुंद माहोरे, सुधीर शेळके, आशिष काळपांडे, वैभव पावडे, अविनाश मांडवगणे, प्रशांत भेंडे, प्रशांत हुडे ,लोकेश शेंडे, संदीप जाधव, ज्ञानेश्वर दमये ,कैलास ऊईके ,आकाश झेले, विनोद गायके, विशाल बमनोटे, प्रफुल कडू, नितीन ढोणे ,ओमप्रकाश हरवानी, उमेश झीबळ ,संदीप जाधव, अनिल नगराळे, राजेंद्र भोगे, अमोल खडसे, काँग्रेस कमिटी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हो