धामणगाव रेल्वे :
मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हिंदू कथेनुसार भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपतीची स्थापना करतात. गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवस उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये घरी, मंदिरामध्ये, सार्वजनिक मंडळामध्ये गणपतीची मूर्ती स्थापित करतात.मा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक महोत्सवाचे रुप दिले होते. प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम यांनी गणपतीच्या मूर्तीचे पूजन केले. शिक्षिका रेणुका सबाने मॅडम यांनी गणेशोत्सव विषयी माहिती सांगितली. गणपतीचे आईवडील कोण होते. माता पार्वतीने गणपतीला कसे बनविले होते याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये शौर्य राठोड गणपती, चातुर्या हांडे रिध्दी, लावण्या बुधलानी सिद्धी, युगविर चरपे कार्तिकेय, ऋतुराज रोंघे शिवजी आणि आभा बारुलकर माता पार्वतीच्या वेशभूषेत आले होते. मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्रि प्रायमरी हेड शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे ,श्रध्दा राॅय, अश्विनी नांदणे यांनी सहकार्य केले.