आर्वी, प्रतिनिधी पंकज गोडबोले
आर्वी : आज दि 01.09.2025 रोजी पोलीस स्टेशन आर्वी हद्दीमध्ये गणेश उत्सव विसर्जन, तसेच ईद-ए-मिलाद सण शांततेत संपन्न व्हावे याकरिता 13.00 वा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी यांचे उपस्थितीमध्ये आर्वी शहरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
रूट मार्च शहरातील वाल्मीक वॉर्ड, कुरेशी मोहल्ला, मायबाई वार्ड, श्रीराम वार्ड, अवलिया मज्जित समोरून, गुरुनानक धर्मशाळा, जनता नगर, नुरी मज्जिद समोरून, इंदिरा मार्केट, गांधी चौक या मार्गाने फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौक आर्वी येथे 14.40 वा. समाप्त करण्यात आला रूट मार्चमध्ये उपविभाग आर्वी येथून 09 अधिकारी, 50 अमलदार, RCP पथक, SRPF लाटून तसेच 60 होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते. संपूर्ण रूट मार्च प्रभावीपणे शहरात शांतता कायम राहावे याकरिता राबविण्यात आलेला आहे.