धामणगाव रेल्वे
अमरावती यवतमाळ वर्धा या तीन जिल्ह्याला तांदूळ, गहू, रासायनिक खते व इतर साहित्य पुरविणाऱ्या येथे १०० वर्षा पूर्वी उभारलेला मालधक्का देवळी येथे हलविणार नसून धामणगावातच राहणार असल्याचे आश्वासन रेल्वे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले दरम्यान आज रविवारी आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात मालधक्का वाहतूकदारांनी गडकरी यांची भेट घेतली
रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनामुळे तब्बल तिन हजार कुटुंबावर येणारी उपासमारीची पाळी टळणार आहे
धामणगाव रेल्वेस्थानकावर १०० वर्षापूर्वी माल धक्क्याची निर्मिती करण्यात आली येथे गहू तांदूळ रासायनिक खते तसेच विविध साहित्य येथे आल्यानंतर तो माल, ट्रक, ट्रॅक्टरने यवतमाळ , अमरावती, वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी घेऊन जातात. पर्यायी येथील हमाल ट्रकचालक, ट्रक मालक यांना अनेक वर्षांपासून रोजगार मिळत आहे येत्या महिनाभरात धामणगाव गुड्स शेडच्या थर्ड लाइनचे काम सुरू होणार असल्याने धामणगाव गुड्स शेडमधील सर्व काम बंद करून पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वे प्रशासनाने देवळी (जि. वर्धा) रेल्वेस्थानकाकडे लक्ष केंद्रित केले होते दरम्यान हा मालधक्का हलवू नये म्हणून मालधक्का वाहतूकदारांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन दिली होती आज रविवारला आमदार प्रताप अडसड यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली
धामणगाव येथील मालधक्यात पाचशेच्या अधिक हमाल काम करतात ट्रक चालक ट्रक मालक हॉटेल चहा कॅन्टीन अशा ३ हजार कुटुंबाचा संसाराचा गाडा या मालधक्क्यावर चालतो त्यामुळे हा मालधक्का इतरत्र हलवू नये अशी वस्तुस्थिती आमदार अडसड यांनी गडकरी यांच्या समोर मांडली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली हा मालधक्का हलविण्यात येणार नाहीं असे आश्वासन रेल्वे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गडकरी यांना दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने आम्हाला न्याय मिळणार असल्याचे मालधक्का वाहतूकदारांनी सांगितले