चांदुर रेल्वे / काही महिन्यापूर्वी आमदार प्रताप अडसड यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या विकासा करिता आलेला 18 करोड रु चा विकास निधी मंजूर करण्यात आला,हा निधी नगर पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासा करिता वापरण्यात येणार आहे मात्र स्थानिक नगरपालिकेत एका विशिष्ट पक्षाचे नगराध्यक्ष न बनल्या मुळे हा शहराचा हक्काचा विकास कामाचा निधी इतर ठिकाणी वळवण्यात येईल अशी जोरदार चर्चा सध्या काही राजकीय कार्यकर्ते करताना दिसत होते, मात्र सदर विकासाचा निधी हा चांदुर रेल्वे शहराच्या विकासात वापरण्यात येईल,अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसड यांनी दिल्यामुळे सर्व चर्चेला पूर्णविराम लागले.
शहराचा विकास व्हावा शहरातील रोड नाल्या चांगल्या प्रकार बांधण्यात यावे म्हणून आमदार प्रताप अडसड यांनी काही महिन्यापूर्वी 18 करोड रु निधी मंजूर करून घेतला हा विकास निधी सार्वजनिक बांधकाम विभाग च्या माध्यमातून शहरातील विकास कामे होणार होते मात्र त्यावेळी काही राजकीय घडामोडी घडल्या व हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागातून नगरपरिषद मध्ये वळवण्यात आला,शहरातील विकास कामे सुरू होण्या पूर्वीच महाराष्ट्रात नगर परिषदेचे निवडणूक लागली,या कामाची टेंडर सुद्धा निघाल्याची बोलले जात आहे,मात्र हल्ली नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे निकाल लागले असून यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे नगराध्यक्ष पराभूत झाले त्यामुळे हा विकासा चा निधी इतर विभागात वळून घेत. नगरपालिकेच्या माध्यमातून काम होऊ देणार नाही,अशी खमंग चर्चा काही राजकीय कार्यकर्त्या करत असल्याचे शहरात पहावयास मिळत आहे,
शहराच्या विकासाचा निधी हा शहरा च्या विकासात वापरण्यात येईल, इतर ठिकाणी हा निधी वळवण्यात येणार नाही या व्यतिरिक्त आम्ही निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन सुद्धा येणाऱ्या काळात पूर्ण करू
आमदार प्रताप अडसड
धामणगाव विधानसभा
















