प्रजासत्ताक दिनी आर्वीतील शहीद भूमिपुत्रा च्या आई वडील व माजी सैनिकांच्या हस्ते शासकीय -योजनांची राष्ट्रवादी कार्यालयातुन सेवेची सुरुवात

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अजितदादा पवार विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या आर्वी येथील जनसंपर्क कार्यालयात आर्वी चे शहीद भूमिपुत्र शेखर बाळस्कर, जे काही वर्षा आधी सैनिक सेवा देत असताना एका स्फ़ोटात शहीद झालेत,त्यांचे वडील गंगाधर बाळस्कर, आई लताबाई बाळस्कर, व भारताच्या सैन्य 64 BN -B S F बटालियन सेवेत आपली 20 वर्षाची, पश्चिम बंगाल, राजस्थान, त्रिपुरा मेघालय, नागालँड,सेवा देऊन नुकतेच निवृत्त झालेले माजी सैनिक घनश्याम तरोने यांच्या हस्ते, आर्वी विधानसभा क्षेत्रातील गोर गरीब नागरिकांना शासकीय -व सरकार च्या सर्व योजनेचा लाभ मिळावा यात प्रामुख्याने, विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत कार्ड, अपंग रजिस्ट्रेशन, वोटिंग कार्ड रजिस्ट्रेशन, कामगार नोंदणी,जिवन प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट,श्रम कार्ड,निराधार,स्कॉलरशिप, कास्ट सर्व सोयी एकाच जागी कमी खर्चात मिळाव्यात नागरिकांची पायपीट होऊ नये या दृष्टीने, तसेच माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांना फक्त शासकीय चालान चा खर्चात, सेवा निशुल्क राहील, असा संकल्प करुंन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात या सर्व योजनेची सुरुवात करण्यासाठी मान्यवराचे हस्ते पूजन करून श्री गणेशा करण्यात आला.

यावेळी शहीद शेखर बाळस्कर यांच्या आई वडिलांना शॉल श्रीफळ पुष्पगुछ देऊन त्यांचा महिला वर्धा जिल्हाध्यक्षा ग्रामीण सौ अश्विनी शिरपूरकर व रोजगार स्वयं रोजगार वर्धा जिल्हाध्यक्षा सौ रेखा वानखडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तर माजी सैनिक घनश्याम तरोने यांना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देविदासजी साठे,युवा नेतृत्व पंकजजी नाकतोडे,श्रीकांतजी कलोडे, पुंडलिकजी भुरके, रामकिसना श्रीनाथे यांनी शॉल श्रीफळ पुष्पगुछ देऊन सन्मान केला, ही सेवा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या आर्वी विधानसभा अध्यक्षा अर्चना धवणे यांनी जबाबदारी घेतली,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजगार सेल च्या विधानसभा अध्यक्षा सोनाली जैन, ता अध्यक्षा सुषमा अतकरी, शहर अध्यक्षा सोनू चिंधेकर, जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे,आर्वी शहर अध्यक्षा मीना बरवट कर, ता. अध्यक्षा माधुरी सपकाळ,भारती पोटफोडे,जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर, ता. अध्यक्ष अरुणराव उमरे, शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर, अशपाक शेख, जावेद भाई,जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे, किशोर मानमोडे,शोएब खान, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व सेल चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

veer nayak

Google Ad