से.फ.ला. हायस्कूलचा देवेश खरड जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय..

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा देवेश श्रीकांत खरड (वर्ग-8 वा ) हा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय आला..
“जल जीवन मिशन” जिल्हा परिषद अमरावती यांच्याद्वारे शालेय स्तरावर फेब्रुवारी 2024 मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लघु चित्रपट स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती वर्ग पाच ते सात करीता प्राथमिक गट, व वर्ग आठ ते दहा करीता माध्यमिक गट होता.. या विविध स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील कित्येक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.. वरील निबंध स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून 17000 निबंध प्राप्त झाले.
यामध्ये प्राथमिक गटातून से. फ. ला. हायस्कूलचा देवेश श्रीकांत खरड याला जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. “जलसंवर्धन काळाची गरज” या विषयावर देवेश खरड याने निबंध लिहिला होता.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबरला पंजाबराव देशमुख सभागृह,अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात देवेश श्रीकांत खरड याला मा. संतोषजी जोशी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अमरावती व मा. प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी ( माध्य.) जि. प. अमरावती या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 5500 रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे,उपप्रचार्य प्रा.प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देवेश खरड याचे अभिनंदन व कौतुक केले आहे…

veer nayak

Google Ad