तळेगाव दशासर :-विदर्भातील नावाजलेला व सर्व दुर महाराष्ट्र भर प्रख्यात तळेगाव च्या शंकर पटाच्या नियोजन च्या बैठकांना येथे कृषक सुधार मंडळाच्या वतीने सुरुवात झालेली आहे. आगामी वर्ष् 2025 च्या जानेवारी महिण्यात 15 तारखे पासून म्हणजेस मकर संक्रन्ती च्या दुसऱ्या दिवसा पासून येथील जंगी पटाला सुरुवात होणार आहे.स्व. नानासाहेब देशमुख नी चालू केली ही पट परम्परेला स्व. बापूसाहेब देशमुखाननी पुढे सुरु ठेवली ज्याला रावसाहेब देशमुख व आता शिवाजी राव देशमुख व आनंद देशमुख हे कृषक सुधार मंडळाच्या वतीने राबवत आहे.विदर्भ भर ख्याती प्राप्त व महाराष्ट्रात शतकोत्तर हे शंकर पटा मध्ये मध्य प्रदेश, मराठवाडा, खान्देश वरून नामवंत बैल जोडीया आपले दमखम दाखवितात तसेच ह्या पटात लांखो रुपयांची उलाढाल होत असते. हया पटात दुर दुरून पट प्रेमी आपली हजेरी लावतात तसेच पट स्पर्धेचा आनंद घेतात. ह्या पटात विशेष करुणं कास्तकार शेतीउपयोगी वखर, नांगर, रूमणे व बैलाच्या ग्ळातल्या टिनमन्या, घुंगरू,झूल तसेच अन्य शेती तील अवजारे खरीदी करण्यास येतात. ह्या व्यतिरिक्त खेळणे, जाते, पाटे व दगडी खलबत्ते,लाकडी दरवाजे व अन्य साहित्याची खरीदी मोठ्या प्रमाणात करतात. ह्या पटात 15 जानेवारी ला दोन दाणी (दोन बैल जोडी), पट स्पर्धा 16 व 17 जानेवारी ला एक दाणी बैल जोडी स्पर्धा (एक जोडी)चे आयोजन करण्यात येते तसेच 18 जानेवारी ला महिलांची बैल जोडी स्पर्धा असतेत ज्याचे सर्व नियोजन महिलांच्या हाथी असते.
ह्या शंकर पटात लोक लोक आवडीने खातात कच्चा चिवडा,,,
ह्या शंकर पटात लोक खास करून स्व. किसनराव सुरजुसे च्या अस्सल वऱ्हाडी चवेच्या कचच्या चीवड्यावर ताव मारतात ह्या चिवड्याची ख्याती इतकी आहे कि लोक पट पाहणायास आले तर हा किसनरावांचा कच्चा चिवडा खाल्या शिवाय पटाचा आनंद अपूर्व आहे असा त्यांना वाटते. विषेश हे कि तळेगाव च्या ह्या शंकर पटात किसन राव सुरजुसे च्या कच्या चिवडा सर्व पट प्रेमीनच्या पट दर्शनाला ला दुगुणित करते हे इतकेच खरं.