झाडगांव :-धामणगांव रेल्वे तालुक्यातील झाडगांव येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न झाला. ह्या कार्यकमाचे उद्घघाटक मा. गौतम इंगळे साहेब ठाणेदार पो. स्टे.मंगरूळ दस्तगीर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कैलास विंचूरकर सामाजिक कार्यकर्ते अमरावती होते. प्रमूख पाहूणे पञकार संरक्षण समिती , श्री गुरूदेव सेवाश्रमाचे सेवक व प्रचारक ह. भ. प. महल्ले गुरूजी यांचे उपस्थितीत ह.भ.प.सत्यपाल महाराज सप्त खंजेरी वादक यांचे हस्ते गरीब, विधवा, निराधार अपंग महिलाना मोफत शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्द्घाटक मा. गौतम इंगळे यांनी मोलाचे मार्गदर्शन उपक्रमास अनुसरून सर्वांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास विंचूरकर यांनी सामाजिक कार्याचे महत्त्व या विषयी अनुकरण करून समाज हिताचे कार्य करण्याचे आपल्या भूमिकेतून विचार संदेश दिला. अॅड. प्रसाद कावळे आपले विचार व्यक्त करताना शासकीय विविध योजनांची माहिती दिली व महिलांबाबत कायदे विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.सामाजिक कार्यकर्ते अमरावती राजेंद्र तांबेकर,पञकार संरक्षण समिती वर्धा शंशाक उर्फ बाळासाहेब चतारे जिल्हाध्यक्ष इत्यादी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केली. तर व्यासपीठावर प्रमूख पाहूणे लोकशाही वार्ता चे जिल्हा संपादक प्रफूलभाऊ देशमुख, मनिष गुडधे, निखिल वागळे, प्रदिप सूंदरकर तर वर्धा येथिल महाराष्ट्र 24चे प्रतिनिधी संतोष देशमुख, यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या जयाताई अराठे, जीवतोडे ताई होत्या.
कार्यक्रमाचे सूञ संचालन सामाजिक कार्यकर्ते घनश्याम भिमटे यांनी केले तर आभार पञकार समिती वर्धा अनिलभाऊ गांवडे यांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पञकार संरक्षण समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमरावती बाबाराव इंगोले यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता श्री गुरूदेव सेवाश्रम झाडगांवचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. ह्या कार्यक्रमास झाडगांव परीसरातील जनतेने तन मन धनाने सहकार्य केले.