प्रतिनिधी: धामणगाव रेल्वे
२०१९ पासून दरवर्षी आस्था एज्युकेशन ॲन्ड मल्टीपरपज सोसायटी अमरावती द्वारे आस्था दीप संमेलनाचे आयोजन केले जाते . या संमेलनाच्या माध्यमातून समाजातल्या विविध स्तरातील समाजबांधवांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समाजातल्या तळागातील लोकांना समाजाच्या मूख्य आर्थिक आणि शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी उद्बोधन आणि चर्चा केली जाते . चौथे आस्था दीप संमेलन अमरावती येथे पार पडले . संमेलनाचे अध्यक्षस्थान पायोटेक्स गृप पुणेचे संस्थापक श्री अभय श्रीरामजी आसलकर यांनी भूषविले. प्रमुख पाहूणे म्हणून विचारपिठावर झिरो टू प्रेसिडेंट या आत्मचरित्राचे लेखक श्री व्यंकट काळे , पारधी समाजासाठी काम करणारे श्री अविनाश देशपांडे, पशूधन विकास अधिकारी डॉ श्री किरण अमृतकर , शासकीय आयुर्वेद महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ अहिरे उपस्थित होते . संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पुजनाने झाली .
यावेळी हिच अमुची प्रार्थना हेच अमूचे मागणे ही प्रार्थना म्हणण्यात आली . प्रास्ताविकातून संमेलन आयोजीत करण्याचा उद्देश आस्था एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री उमेश पिंपळकर यांनी व्यक्त केला . याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अध्यक्ष श्री अभय आसलकर , श्री प्रकाशजी नागपूरकर , श्री खाकरे अध्यक्ष आस्था नागरी सह पतसंस्था अमरावती, श्री किरणजी शेलेकर उपाध्यक्ष आस्था नागरी सह पतसंस्था अमरावती , श्री दिपक माथूरकर माजी संमेलनाध्यक्ष, श्री गजानन अंजनकर संस्थापक आस्था गृप, प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर , सौ संगिताई उंबरकर उपाध्यक्ष आस्था एज्युकेशन सोसायटी अमरावती यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गेल्या दोनवर्षात शासकीय निमशासकीय तथा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रुजू झालेल्या साठ युवक युवतींचाही सत्कार करण्यात आला व भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कारानंतर रिवा मध्यप्रदेश येथील कमिश्नर श्री सोनवणे साहेब यांचा शुभेच्छा संदेश प्रोजेक्टर वर दाखवण्यात आला. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आष्टीचे प्रसिद्ध व्याख्याते तथा संत साहित्याचे अभ्यासक श्री सुभाष लोहे यांचे शिक्षण परिवर्तनाचे माध्यम या विषयावर व्याख्यान पार पडले . त्यांनी अनेक संताचे दाखले देत विशेषतः (संत सेना )समाजाच्या संपूर्ण उत्कर्षासाठी शिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात श्री अभय आसलकर यांनी समाजाच्या विकासासाठी संघटन व सहकाराची गरज व्यक्त केली . कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्था एज्युकेशन सोसायटीचे सचीव प्रा. नरेश कावलकर , संचालक प्रा. अंकुश मानकर यांनी तर आभार आस्था नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री चेतन काणेकर यांनी मानले . या संमेलनाला आस्था कोअर आस्था नागरी सहकारी पतसंस्था मर्यां अमरावतीचे सर्व संचालक, आस्था एज्युकेशन ॲन्ड मल्टीपरपज सोसायटी चे सर्व संचालक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधवांची उपस्थिती होती .