डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित पुष्प प्रदर्शनी २०२४ मध्ये श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयास प्रथम पारितोषिक. 

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी) 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित श्री. संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथील दोन विद्यार्थी नि यांनी श्री. शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे पंजाबराव देशमुख यांचे जयंती उत्सवानिमित्त आयोजित पुष्प प्रदर्शन २०२४ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. 

श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती द्वारा श्री. शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती येथे आयोजित पुष्प प्रदर्शन २०२४ मध्ये श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी राजुरकर व कुमारी रितिका भोंगाडे, यांनी फ्लोरल कार्पेट (प्रकार १३) मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. यासाठी त्यांना प्राचार्य वृषाली देशमुख, कुमारी चंचल ठाकरे,प्रा. मनीषा लांडे यांचे सहकार्य प्राप्त झाले. 

महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्राचार्य सौ वृशाली देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारीप्रा.दीपक बोंद्रे ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी अभिनंदन केले.

veer nayak

Google Ad