जिल्हा परिषद क्रीडा संकुलन आर्वी येथे उपविभागीय अधिकारी मा. विश्वास शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

0
340
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, ता. प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : २६ जानेवारी जिल्हा परिषद क्रीडा संकुलन येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून पुष्टी दिली. २६ जानेवारी १९५१ रोजी भारताने प्रथमच प्रजासत्ताक दिन साजरा केला. असे किटे सर यांनी आपले प्रास्तविकेतून प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. उपविभागीय अधिकारी मा. विश्वास शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी पोलीस उपविभागीय डि. सि. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण पोलीस परेड पथक व किशोर गोडबोले ढोल पथक, प्रमोद नागरे एनसीसी परेड पथक यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मा. विश्वास शिरसाट, तहसीलदार मा. हरीश काळे, आमदार मा. सुमित वानखडे यांचे सर्व पथकांनी सलामी देऊन स्वागत केले. व विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले कला नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शीलड देऊन सन्मानित केले. तसेच याप्रसंगी महसूल विभागातील तालुका स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शेंडे सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री खंडारे सर यांनी केले व सर्व प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचे आभार प्रमोद नागरे सर यांनी मानले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दादाराव केचे, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, वनविभाग मुख्याधिकारी गायत्री सोनवणे, मुख्याधिकारी न. प. आर्वी डाॅ. किरन सुकलवाड, गटविकास अधिकारी सुनिता कोल्हे, विजय अजमीरे, अनिल जोशी, डॉ.अरुण पावडे, सुनील पारसे व व्यापारी बंधू , पत्रकार बंधू, शिक्षक व आर्वीतील सर्व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad