77 व्या प्रजासत्ताक दिनी श्रीराम शाळेत महिला व बाल कल्याण सभापती सौं भारती दिलीप पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहन

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी :- दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार रोजी देशातील सर्व नागरिक देशात सर्वत्र मोठया उत्साहता 77 वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करत होते.

आणि यावेळी २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू होऊन भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक बनला, या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत होते हा क्षण देशातील प्रत्येक नागरिकांसाठी त्यांच्या मनात देशाप्रती असलेलं प्रेम आदर व भावना व्यक्त करण्याचा मोठा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनी विविध शासकीय कार्यालयात – सर्व शाळेत देशाचा तिरंगा ध्वज फडकवून ध्वजा ला सलामी देऊन तिरंगा व देशाप्रती सन्मान अर्पण केल्या जाते, आज 26 जानेवारी 2026 रोजी आर्वी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मायबाई वार्ड येथील श्रीराम शाळेत सकाळी ठीक 7:15 मिनिटांनी ध्वजा रोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका व महिला व बाल कल्याण सभापती सौं भारती दिलीप पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देत राष्ट्रगीत गाऊन तिरंगाध्वजा ला सन्मान अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम शाळेचे मुख्याध्यापक रवि शिरपूरकर यांनी केले तर नियोजन शिक्षक अनिल मसराम यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, अक्षय कळंबे, राहुल झोपाटे, मीनल कोल्हे, सनी पंचगडे, मंदार मालेकर, प्रशांत भिसे, किरण लंगडे, जान्हवी बोडाखे, हर्षल खरकाटे, दर्पण मोटवानी, अनिकेत थीगळे शुभम लवटे व श्रीराम शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते

veer nayak

Google Ad