अंजनसिंगी येथे पाच दिवसीय सामनेर व अनागारीका शिबिर संपन्न

0
69
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियाना अंतर्गत अंजनसिंगी येथे सामनेर व अनागारीका शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन गजानन भेंडे तर उद्घाटक अध्यक्ष म्हणून प्रवीण हेंडवे यांनी सुरुवात केली होती.
या पाच दिवसीय शिबिरामध्ये प्रामुख्याने पूज्य भन्ते धम्मसेन यांनी सर्व श्रामणेर यांना या शिबिरामध्ये पंचशील म्हणजे काय आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय दहा पारमिता अशा वेगवेगळ्या विषयावर आपलेमार्गदर्शन केले. प्रामुख्याने उपस्थिती म्हणून पूज्य भंते धम्मतिष्य पूज्य भंते राहुल यांनीही आपली महत्त्वाची भूमिका या शिबिरामध्ये मांडली व सर्वांना दीक्षा यांनी दिली.

दीक्षा घेत असताना या विनयाचे महत्त्व काय हे सुद्धा या भंतजींनी यावेळी समजावून सांगितली. अनेक मान्यवर मंडळी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आली प्रामुख्याने उज्वल हेंडवे यांनी या विद्यार्थ्यांना व श्रामनेर यांना स्पर्धा परीक्षा कशाप्रकारे दिल्या जाते आणि स्पर्धा परीक्षेचे महत्त्व काय विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे याचे सुद्धा महत्त्व या शिबिरामध्ये त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार गुलाब मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.


आजचा विद्यार्थी व आंबेडकर चळवळ या विषयावर निशांत दहाट महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रवीण इंगळे व चेतन चव्हाण मानसिक व शारीरिक बदल तसे काय होतात आणि आपण त्या मधलं काय घेतलं पाहिजे या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमांमध्ये या समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भगवान इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश लिंगाटे इंदुताई नारनवरे,जगदीश शिंदे, रवींद्र कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लिंगाटे म्हणाले की सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा होत असली तरी विद्यार्थ्यांनी नोकरी मिळाली तर ठीक परंतु उद्योग क्षेत्रातले आपण वडले पाहिजे उद्योगामुळे अनेकांना काम देण्याची संधी आपल्याकडे प्राप्त होते.
या शिबिराला नागपूर मुंबई वर्धा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संपूर्ण गावांमधून मंगल मैत्री रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यासोबतच प्रत्येक चौकामध्ये या सर्वांचे स्वागत करण्यात आले या रॅलीमध्ये गावातील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला लहानपणापासूनच मुलावर चांगले संस्कार घडावे यासाठी अनेक संस्कार शिबिरे आणि आयोजित करत असल्याचे जगदीश शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पपीता मनोहरे तर आभार प्रदर्शन ज्योती मेश्राम यांनी मानले. पाच दिवसीय शिबिर यशस्वी करण्याकरिता सर्वश्री राजाभाऊ मनोहरे, नितीन टाले, बंडूभाऊ आठवले,मृदुला हेरोडे, दिघाडे ताई,सुनील शिंदे, रमेश काळे, रवींद्र कांबळे,गजानन गवई आदींनी अथक परिश्रम घेतले येणाऱ्या काळात ही शिबिरांची चळवळ राबविले जाईल असे अभियानाच्या वतीने सांगण्यात आले.

veer nayak

Google Ad