आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आर्वी जि.वर्धा दिवाणी न्यायालय येथील वरिष्ठ स्तर या न्यायालयाचा सन्माननीय अतिथींच्या हस्ते उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. माननीय न्यायमूर्ती श्री नितीन वा. सांबरे उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते तसेच माननीय न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला स. जोशी-फलके उच्च न्यायालय, मुंबई, मा. न्यायमूर्ती जवळकर मॅडम उच्च न्यायालय मुंबई यांच्या उपस्थितीत आणि श्री संजय जु. भारूका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता पीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक अवतार सिंग गुरुनासिंघानी यांनी केले तर संजय भारूका प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय यांनी आर्वी, आष्टी, कारंजा तीन तालुक्या मिळून वरिष्ठ स्तर न्यायालय आर्वी तालुक्याच्या ठिकाणी झाल्याने स्थानिक नागरिकांना सोयीचे झाले असून यामध्ये सामान्य नागरिकांचा खर्च कमी होणार व तिन्ही तालुक्यासाठी सोयीचे झाले असून वेळ व पैसा वाचणार आहे असे आपले मनोगत व्यक्त केले. व तसेच अमोल सुर्वे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ अपर आर्वी, यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
अॅड. श्री मोहन गहलोत अध्यक्ष, वकील संघ, आर्वी जि. वर्धा
श्री एस. ए. एस. एम. अली
जिल्हा न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीते करिता मंगेश करडे, राजेंद्र गुरुनासिंघानी, संजय तीरभाने, रोहित राठी, वि. टि. देशपांडे, योगेश राठी, अविनाश चौधरी, परिश्रम घेतले.
व आर्वी आष्टी कारंजा तीनही तालुक्यातील सर्व अॅडवोकेट मंडळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.