धामणगाव रेल्वे स्थानिक विश्रामगृह भगतसिंग चौक येथे शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांच्यामार्फत महिला सक्षमीकरण संदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध लोक उपयोगी योजना ह्या तळागाळातील महिला पर्यंत पोहोचून त्याचा लाभ घेऊन महिलांनी स्वबळावर सक्षम व्हावे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता तसेच धामणगाव विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे व वस्त्यांमध्ये असलेल्या समस्याचे निवारण करण्याकरिता महिलांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा महिला सक्षम तरच देश व राज्य सक्षम होईल असे मत
भाजपाचे विधानसभा प्रमुख श्री रावसाहेब रोठे यांनी व्यक्त केले या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री रावसाहेब रोठे शिवसेना उपजिल्हा संघटक रणजीत पाटेकर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ मायाताई देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुनीता जगताप उपतालुका अध्यक्ष भाग्यश्री सावडीकर दुर्गाताई उगले वंदना मुंदाफडे,मनीषा चौरे मनीषा देशमुख रूपाली गुल्हाने,नंदाबोंडे नीलकमल बुटले कीरण गुल्हाने,लता गोपाळ रजनी धमंदे ज्योती दाभेकर मनीषा चव्हाण शितल माळवदे मालती काटकपुरे सुषमा पालिवाल, माया ठाकरे सुचिता हांडे यासह शेकडो महिला उपस्थित होत्या