अतिवृष्टीची नुकसान भरपाई व पिक विम्याच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनसह शिवसेनेचा मोर्चा धडकला तहसिल कार्यालयावर

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद शेतकऱ्यांची नारेबाजी

शेती झाली जलमय सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे अतोनांत नुकसान

नांदगाव खंडेश्वर/
तालुक्यात दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसाने शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीन कापूस व तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाप्रमुख मनोज कडू बाळासाहेब राणे यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले वाहून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे अतोनांत नुकसान झाले आहे सततच्या पावसाने अतिवृष्टी झाल्याने पिके खरडून गेली आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना नांदगाव तालुक्यात अद्याप पंचनामे करण्यात सुरुवात झाली नसून सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असतांना तहसीलदारांच्या लेखी आदेशाशिवाय पंचनामे करता येणार नसल्याचे तलाठी सांगत आहे म्हणून शिवसेनेने शेतकऱ्यांसह तहसिल कार्यालयात मोर्चा काढून मुख्यमंत्री फडणवीस मुर्दाबाद अशी नारेबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी तहसिलदार यांना घेराव करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करीत सन २०२४ चा खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर असून शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही सदर पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व मे महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी के.वाय.सी. करून सुद्धा मदतीची रक्कम मिळाली नसून सदर अनुदानाची रक्कम देण्यात यावी व सदर अवकाळी पावसाच्या मदतीच्या यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली असून अशा शेतकऱ्यांना सुद्धा अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देण्यात यावी व निराधार योजनेची रक्कम सहा महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाली नाही ती तात्काळ देण्यात यावी.

अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी जिल्हाप्रमुख मनोज कडू प्रकाश मारोटकर बाळासाहेब राणे दिलीप देवतळे मनोहर सावंत पंकज पिंपळकर अक्षय राणे निलेश इखार गुणवन्त चांदूरकर रवी ठाकूर गजानन गावंडे विजय सुने गोपाल बनकर सुरेंद्र गावाफळे लीलाधर चौधरी लोकेश उटबगले अरुण गिरी अरुण कापडे जगदीश दुधे नारायण डकरे राजेंद्र पोफळे अमोल पकडे महेंद्र भेंडरकर शाम सुने उकंडराव नितनवरे निलेश मारोटकर भुमेश्वर गोरे सुमित चौधरी आकाश रुमने गौरव देशमुख विजय चवाळे विलास देशमुख प्रवीण इंगळे चेतन केळकर यांचेसह शेकडो शेतकरी शिवसैनिक उपस्थित होते

veer nayak

Google Ad