धामणगाव रेल्वे:-ग्रामीण पत्रकारांसाठी सदैव कार्यरत असलेली व ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांची जाण असलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची धामणगाव रेल्वे तालुक्याची कार्यकारणी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या आदेशान्वये कार्यकारी अध्यक्ष युसुफ भाई यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना तालुका धामणगाव रेल्वेची कार्यकारणी आज घोषित केली.
यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून दैनिक लोकमतचे पत्रकार मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील दैनिक लोकमतचे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले नितीन टाले यांची तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष म्हणून निलेश चवरे, तालुका सचिव प्रशांत भाऊ नाईक, तालुका सहसचिव शशांक चौधरी, तालुका संघटक बाबारावजी इंगोले, तालुका सहसचिव मुन्ना भाऊ गुप्ता, तालुका संपर्कप्रमुख डॉ. राहुल चौधरी, तालुका कोषाध्यक्ष निलेश भाऊ रामगावकर दैनिक लोकमत तळेगाव, तसेच धामणगाव रेल्वे अध्यक्षपदी शेख हाफिज भाई यांची निवड करण्यात आली.
तालुक्यात पत्रकारांच्या समस्या सोडवणे. पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्या विरोधात काम करणे. हा संघटनेचा मुख्य उद्देश असून संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून पत्रकारांनी काम करावे असे मत ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी व्यक्त केले.
या बैठकीला ग्रामीण पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष शेख युसूफ भाई, बाळासाहेब स्वर्गीकर, अशोकराव पवार केंद्रीय उपाध्यक्ष, राहुलजी कविटकर, बाबासाहेब खडसे केंद्रीय कार्यालय अध्यक्ष, संघटित पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय सायरे उपस्थित होते.
या बैठकीला धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी मंगरूळ दस्तगीर, झाडगाव, चिंचोली देवगाव ,तळेगाव दशासर, जुना धामणगाव ,परिसरातील दैनिक लोकमत ,देशोन्नती, पुण्यनगरी व इतर साप्ताहिक यूट्यूब चैनल चे प्रतिनिधी उपस्थित होते