श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे इव्हिनिंग क्लासेस चा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व विद्यार्थ्यांचे कुमकुम तिलक व भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले . विद्यार्थ्यांना त्यांच्या आठवणी स्मरणात राहण्यासाठी सुंदर असे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते तसेच मुख्य प्रवेश द्वारावर रिओ सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होता. या इव्हिनिंग क्लासेस ची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली आणि या इव्हिनिंग क्लासेस चे उदघाटन आदर्श कॉलेज चे सूक्ष्म जीवशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.श्नी. निलेश सोनोने सर यांनी रिबन कापून केले.वर्ग खोल्या आणि शाळेचे मैदान विविध खेळण्यांनी सुसज्ज करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खेळ, नृत्य आणि गाणे शिकवण्यात आले या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना सक्षम करणे होय. विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध उपक्रमामध्ये उत्साहाने भाग घेतला व सर्वांनी कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या इव्हिनिंग क्लासेस चे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता, प्रणिता जोशी , रेणुका सबाने वर्षा देशमुख राणी रावेकर ,आकांक्षा महल्ले, प्राजक्ता दारुंडे श्रद्धा राय आणि अश्विनी नंदाणे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.