रविवारी श्री सिद्धिविनायक मंदिर येथे प्रकट दिनानिमित्त श्रींच्या “पादुकांची” स्थापना

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, 

येथील कृष्णा नगर मधील श्री सिद्धिविनायक देवस्थान येथे शहरातील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन व स्थापनेचा कार्यक्रम प्रकट दिनाच्या निमित्ताने रविवार दि.३  मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

कृष्णा नगर परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबाराव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी ११ वाजता पादुकांचे पूजन व स्थापना होणार असून दिनांक ४ मार्चला सकाळी ९ वाजता पारायणाचा कार्यक्रम तसेच दुपारी १२ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्ताने ४ मार्चला सायंकाळी ७ वाजता सामूहिक प्रार्थनेचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून सामूहिक प्रार्थना नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे उपरोक्त अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमात तसेच श्री गजानन माऊलींच्या पादुकांच्या स्थापनेच्या कार्यक्रमात माऊली भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सिद्धिविनायक देवस्थान,कृष्णा नगर चे अध्यक्ष विलास कडू व ट्रस्ट ने केले आहे

veer nayak

Google Ad