प्रतिनिधी
येवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व भाऊसाहेब देशमुख उ.मा. विद्यालयलयात काळाची गरज लक्षात घेता व विद्यार्थ्यांना नेट बँकिंग व्यवहार समजणे आवश्यक आहे याकरिता शाळेचे शिक्षक सुमित वानखडे यांच्या प्रयत्नातून वर्ग 5ते 7 च्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी स्वतःची बँक स्थापन केली त्यांच्या या कार्याचे शाळा प्रशासनाकडून व पालकांकडून अभिनंदन केल्या जात आहे,
शाळेचे प्राचार्य एन एन बोरोळे व येवदा शिक्षण संस्थेचे संचालक तथा क्रीडा शिक्षक मनोज देशमुख अनुपमा देशमुख पर्यवेक्षक अथर यांचे मोलाची सहकार्य लाभले याप्रसंगी अर्थशास्त्र विषय शिक्षक प्रा किशोर थोटे यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या आर्थिक व्यवहाराविषयी माहिती सांगितली बँकिंग व्यवहार सुरळीतपणे चालू राहण्यासाठी व्यवस्थापक – तनवी कंकाळे, बचत खाते प्रमुख – तनुश्री मोहोळ, कॅशियर – सुयोग नाळे, लेखनीस – राज कुटाफळे हे विद्यार्थी बँकेचे व्यवहार सांभाळतात यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या शिक्षकांकडून कौतुक केल्या जात आहे,