अमरावती (प्रतिनिधी) विश्वरत्न, बोधीसत्व भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची राजकीय सत्ता प्राप्त करण्याकरीता आणि आंबेडकरवादी विचारांचे प्रतिनिधी निवडुन आणण्याकरीता सामाजिक तसेच लोकतांत्रिक आंदोलन राज्यासह संपूर्ण देशात गतिमान करण्याचा संकल्प घेवुन भिमा कोरेगाव शौर्य दिनी १ जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह चपराशीपुरा येथे भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाची स्थापना करण्यात आली तसेच या कार्याक्रमाअंतर्गत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा गुणगौरव करुन सत्कार करण्यात आला. भारतीय रिपब्लिकन पैंथर मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी श्री. दादासाहेब पी.बी. खडसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आगामी होवु घातलेल्या अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय रिपब्लिकन पैंथर मोर्चा समविचारी संघटनांना सोबत घेवुन मनपा च्या जवळपास तीस प्रभागात आपले स्वतंत्र उमेदवार उभे करुन निवडुन आणण्याची घोषणा यावेळी भारतीय रिपब्लिकन पँथर मार्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पी. बी. खडसे यांनी केली आहे. शोषीत, वंचित, दलितांची सत्ता मिळविण्यासाठी आंबेडकरवादी राजकीय आंदोलन म्हणुन भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा महाराष्ट्र सह संपूर्ण देशात कार्य करणार अशी घोषणा यावेळी भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पो.बी. खडसे यांनी केली आहे. आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि शोषीत, वंचितांच्या वेदना, समस्या व दुःख संपलेले नाही.
शोषीत, वंचितांचे कायदेशिर व संविधानीक हक्क मिळविण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाची स्थापना करण्यात आल्याची घोषना यावेळी भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पी.बी.खडसे यांनी केली. कार्यक्रमाची प्रस्तावना भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे श्री. मनोज ढवळे यांनी केली तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. विशुध्दानंद जवंजाळ यांनी केले. कार्यक्रमाला भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे श्री. मनोज ढवळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आनंद हिवराळे, माजी नगरसेवक सुरेश मेश्राम, क्रांतीभुषण खडसे, प्रदीप महाजन, नंदकिशोर पाटील, शंकर गहेकर, प्रदीप विघ्ने, रंजन घरडे, दिपक धंदर, प्रमोद पोकळे, अजय मंडपे, राजाभाऊ जवंजाळ, सौ. उमाताई जवंजाळ इत्यादी कार्यकर्त्यांसह आंबेडकरवादी विचाराचे युवा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
__________________________