अमरावती, दि. 05 : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गुरूवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूरहून अमरावतीकडे प्रस्थान केल्यानंतर, ते सकाळी 9 वाजता अमरावती महानगरपालिका हद्दीतील विविध शाळांना भेटी देतील.
दुपारी 1 वाजता सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता ‘उपक्रमशील शिक्षक’ चर्चासत्रात भाग घेतील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील.