नितीन कदम यांच्या सतर्कतेमुळे भातकुली वासियांचा पाणीपुरवठा समस्या संपुष्टात सततच्या पाठपुराव्यामुळे नियमित पाणीपुरवठा सुरु

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी/अमरावती

भातकुली परिसरातील विविध गावामध्ये (आसरा, सायत, नांदेळा, ऋणमोचन) कमी दाबाने व कमी वेळ होणाऱ्या पाणीपुरवठ्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले होते. ग्रामस्थांनी संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यालयात येवून याविषयी तक्रारी केल्या. याची दखल संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.वारंवार विचारणा, दस्तऐवजाची देवाण घेवाण, निवेदने दिल्यानंतर तसेच विभागाचे अधीक्षक अभियंता, सायत, आसरा , ऋणमोचन, नांदेळा उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क साधत जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी, व नावीन्यपूर्ण स्वयंचलित कूपनलिका बसवाव्या अशा सूचना दिली.
*सदर बाब येत्या उन्हाळ्यासाठी गंभिर स्वरूपाची असुन त्यावर तात्काळ प्रशासनाने जलवाहिन्यांच्या ठिकाणी नवीन वॉल बसविल्याने सदर गावांची पाणीसमस्या संपुष्ठात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी नितीन कदम व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.अनेक वष्रे पाण्याचे दुर्भिक्ष्य सोसणाऱ्या भातकुली तालुक्यांतील विविध गावातील ग्रामस्थांना आता कूपनलिकेद्वारे मुबलक पाणीपुरवठा होऊ लागला आहे.
*गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठें व्यवसाय, वाहतूक वाढीत असल्याने भातकुली तालुका व्यापक होण्याच्या पार्श्वभूमीवर गावाचा परिसर अमरावती शहराचे उपनगर म्हणून विकसित होऊ पाहत आहे.

यामुळे भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता. आतापासूनच आणखी पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे बनत चालले आहे.
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना भातकुली तालुक्यांतील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले होते. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या भागातून महिलांना पाणी आणावे लागत होते.पाण्याचा उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर चालली आहे. पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे.

शहरी भागात पाणीपुरवठा योजना असल्या तरी ग्रामीण भागात मात्र पाणी पुरवठा योजना नाहीत. त्यामुळे विहिरी किंवा हातपंपांच्या भरवशावर पाण्याची गरज भागवावी लागते. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. महिन्याच्या शेवटी आता उग्र रूप धारण केले आहे. पाणी मिळत नसल्याने हातपंप व विहिरी यांच्यासमोर पाण्याचे भांडे धरलेल्या महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे.आपल्या परीसरातील हातपंप व विहीर आटल्यानंतर गावातील ज्या हातपंपाला पाणी अधिक आहे. अशा हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येत आहे. सदर भागात मे महिन्यापासून उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात होते. मे-जून या कालावधीत कडक उन्हाळा तापतो. त्यामुळे या कालावधीत पाणी टंचाईची समस्या अतिशय गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे पाळीव प्राणी आहेत. पावसाळा व हिवाळ्यात ही जनावरे तलाव, नाला येथील पाणी पिऊन येतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बाहेर तहान भागविणे शक्य होत नाही. परिणामी जनावरे घरीच येऊन तहान भागवत असल्याने पाण्याची समस्या वाढली आहे. पाणी भरण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.पाणी पुरवठा योजना नावापुरत्याच आहे.ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनाने लाखो रूपये खर्चून काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बांधून दिल्या आहेत. परंतु या नेतृत्वहिन तालुक्याला या योजनेचा लाभ फक्त कागदावरच मर्यादित राहिला आहे. अशातच संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखत स्वयंचलित कूपनलिका विभागाकडून स्वीकृत करून पाणीटंचाई सोसत असलेल्या या भागात आता आनंदाचे वातावरण पसरले आहे. नितीन कदम यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होतांना दिसून येत आहे.

veer nayak

Google Ad