वीज विभागाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार लाईन बंद होत असल्याने महावितरण विभागला दिले निवेदन,

0
61
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे/

गेल्या काही महिन्यांपासून वीज विभागाच्या मनमानी कारभाराला सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मार्च एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हात तहसील व शहरातील नागरिकांना नेहमी नेहमी लाईन ट्रिप होणे वारंवार व अकाली लाईन बंद पडणे,अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याअभावी जून महिन्यात आर्द्रता वाढत आहे, अशा स्थितीत वीज विभाग दररोज रात्री बे रात्री लाईन बंद करून, बेकायदेशीर पणे लोड शेडिंग करून जनतेला त्रास देत आहे. या समस्येबाबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महावितरण विभागाचे कार्यालय गाठून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या समस्येची माहिती देऊन लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्या करीता निवेदन दिले.

रविवारी सकाळी हलका पाऊस पडल्यानंतर सकाळी ६ तास ही लाईन बंद राहिली, या संदर्भात विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन केला असता फोन बंद किंवा कव्हरेज क्षेत्राबाहेर टोन ऐकू येत आहे. येथे कार्यरत अधिकारी अमरावती, नागपूर येथून अपडाऊन करतं असून, अधिकाऱ्यांना साप्ताहिक सुटी असल्याने जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. या असंवेदनशील कार्यशैलीमुळे वीज विभागाची निष्क्रियता समोर येत आहे.

मार्च, एप्रिल, मे, जून महिन्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे वयोवृद्ध, आजारी व सर्वसामान्य नागरिक अधूनमधून लाईन बंद पडणे, वारंवार ये-जा करणे अशा समस्यांमुळे नागरीक त्रस्त झाले असून, वारंवार लाईन जान्या मुळे घरातील महागडी विद्युत उपकरणे खराब होत आहे. जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने आर्द्रता वाढत आहे, अशा स्थितीत वीज विभागाची लाईन वारं वार लाईन बंद राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांची अवस्था बिकट होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद राहणे किंवा कव्हरेज क्षेत्राबाहेरील आवाज ऐकू न येणे ही चिंतेची बाब आहे. रविवारी पहाटेच्या हलक्या पावसानंतर सकाळी 6 ते दुपारी 12 वाजे पर्यंत लाईन बंद करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या घटना शहर व तहसीलमध्ये दररोज घडताना दिसत आहेत. चांदूर रेल्वे तहसीलच्या विद्युत विभागाकडून तांत्रिक बिघाड आणि किरकोळ समस्या सांगून तासनतास वीज बंद ठेवणे आणि लोड शेडिंग करणे हे नित्याचेच झाले आहे. वीज विभागाच्या मनमानी वृत्तीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होताना दिसत असून या विभागाच्या अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर येत आहे. अशी चर्चा शहर व तहसीलमध्ये सामान्य नागरिक करताना दिसत आहेत.

veer nayak

Google Ad