चांदुर रेल्वे ता. प्र. प्रकाश रंगारी
चांदूर रेल्वे :- चांदूर येथून जवळच असलेल्या धोत्रा (जवळा) या गावांमध्ये भाजपा पक्षाचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अक्षय गडलिंग यांनी पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी खंडारे यांना गेल्या कित्येक दिवसापासून गावामध्ये लोखंडी बेंच देण्यात यावे ही मागणी केली होती. अक्षय गडलिंग त्यांच्या मागणीचा विचार करून पंचायत समिती चांदुर रेल्वेच्या उपसभापती शुभांगी खंडारे यांनी आज धोत्रा गावामध्ये लोखंडी बेंच दिले. त्याबद्दल भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस अक्षय गडलिंग व गावातील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते देविदास गडलिंग, बुथ प्रमुख सुनील थेटे युवा मोर्चा तालुका कार्यकारणी सदस्य. वैभव कचवे, ग्रा. प. सदस्या पल्लवी वासनिक तसेच गावातील युवा कार्यकर्ते शिवकुमार गोंडाने, सुनील मेश्राम, विजय केवट, अंकुश भोयर, प्रशांत चेंडकपुरे,गोपाल केवट, सर्वेश उके, प्रवीण रामटेके, गजानन गोंडाने, आकाश गोंडाने, अतुल गोंडाने, अजय केवट आशिष गोंडाने, अतुल मेश्राम, योगेश तुरकाने, पंकज शामकुवर सनी अडकणे, सागर मेश्राम, प्रज्वल मेश्राम, प्रथमेश कांबळे, विक्रम कांबळे, नैतिक गोंडाने, पंकज उके आशिष उके यांनी उपसभापती त्यांचे आभार मानले.