सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक त्रस्त. दोन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव. संरपच संघटना ने दिले निवेदन 

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी

चांदूर रेल्वे तालुक्यातील दहिगाव धावडे, कवठा कडू, दिघी कोल्हे,धानोरा मोगल सांवगी संगम,पळसखेड,भिलटेक या गावाला मालेखेड येथुन वीज पुरवठा होतो परंतु मागील २ महिन्यापासून विजेचा लपंडाव हा या भागातील नागरिकासाठी डोकेदुखी ठरत असून स्थानिक कर्मचारी नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या घेऊन संरपच संघटना ने उपअभियंता कार्यालयात निवेदन देऊन समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे सुर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी नियमबाह्य वीज पुरवठा खंडीत करून ग्रामीण जनतेला वेठीस धरत असल्याने ग्रामीण नागरीक त्रस्त होऊन मालखेड रेल्वे येथिल वीज कार्यालयात तक्रारी घेऊन गेले असताना या ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असून उन्हाळ्यातही ग्रामीण जनतेला वीज वितरण कंपनी नाहक त्रास देत असल्याने दहिगाव धावडे, कवठा कडू, दिघी कोल्हे,धानोरा मोगल सांवगी संगम,पळसखेड,भिलटेक या गावातील संरपच यांनी एकत्र येऊन शुक्रवार ७ जुन रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील उपअभियंता कार्यालयात निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे या करीता निवेदन दिले यावेळी संरपच संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, संरपच पवन धावडे,अमोल लाहबर,अभिजीत राजनेकर,अमोल देशमुख विलास धावडे सह गावांतील नागरीक उपस्थित होते.

veer nayak

Google Ad