धामणगाव रेल्वे,
वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देत तालुक्यातील रुग्णाच्या हृदयात अजरामर स्थान मिळवणारे स्व. डॉ.ओमप्रकाश चांडक यांच्या ११ व्या स्मृति प्रित्यर्थ रविवार ला मोफत रोगनिदान शिबिर स्व.डॉ. ओमप्रकाश चांडक परिवार व माहेश्वरी नवयुग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माहेश्वरी भवन येथे संपन्न झाले.
या शिबिरात विविध आजाराचे शेकडो रुग्णांची तपासणी करुन औषध वितरण करण्यात आले. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि हजारो रुग्णांचा व गरिबांचा देवदूत म्हणून डॉ. ओमप्रकाश चांडक यांची ओळख होती. त्याच पद चिन्हावर चालून त्यांचा चिरंजीव डॉक्टर प्रीतम आपल्या तालुक्यातील रुग्णांची सेवा करीत असल्याचे उदघाटक माजी आ.प्रा.विरेंद्र जगताप यांनी सांगितले.
याप्रसंगी माहेश्वरी हितकारक संघाचे अध्यक्ष अनिल पनपालिया यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सेवेचा उल्लेख केला
शिबिरात डॉ. अनुज सारडा, हृदयरोग तज्ञ, नागपूर,डॉ. वसंत डांगरा, मेंदूरोग तज्ञ, नागपूर,डॉ. नवीन सोनी, नेत्ररोग तज्ञ, अमरावती,डॉ. आदित्य बोथरा, अस्थिरोग तज्ञ, नागपूर,डॉ. अमित राठी, कान, नाक, वस्त्र विशेषज्ञ, नागपूर,डॉ. विक्रम राठी, छाती व दमा रोग तज्ञ, नागपूर,डॉ. केतन दागडीया, पेन मैनेजमेंट तज्ञ, नागपूर,डॉ. कीर्ती सोनी, पॅथोलॉजीस्ट, अमरावती, डॉ. रोहीत मुंधडा, कॅन्सर सर्जन, अमरावती,डॉ. योगेश कोळमकर, हृदय रोग तज्ञ, नागपूर,डॉ. प्रिती (चांडक) राठी, सीरोग तज्ञ, अकोला,डॉ. मोनीका चांडक, दंतरोग तज्ञ, नागपूर,डॉ. प्रितम चांडक, मानसिक रोग तज्ञ, नागपूर या तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.
शिबिर यशस्वीते करिता नवयुग मंडळाचे अध्यक्ष गौरव कोठारी पनपालिया,गौरव गांगण,चेतन राठी,संदेश पनपालिया,दक्ष राठी व कृष्णा केला व वंश मुंदडा यांनी प्रयत्न केलेत
कार्यक्रमाचे संचालन विजय लोहिया यांनी तर आभार डॉ. प्रितम चांडक यांनी मानले
—————-