डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ यांची सेंद्रिय शेती तज्ञ श्री रमेश जी साखरकर भिल्ली यांचे देशी बियाणे बँक व सेंद्रिय प्रक्षेत्राला भेट.

0
53
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(माणगाव रेल्वे प्रतिनिधी) 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ प्रीती सोनकांबळे, प्रा.नयना पळसपगार, व त्यांचे सहकारी श्री. मोहन सुरुशे, कुमारी नेहा माने, कुमारी शुभांगी दामोदर, यांनी विद्यापीठाचे “शाश्वत कृषी विकासासाठी जैवविविधतेचे संवर्धन” या प्रकल्पांतर्गत नुकतीच सेंद्रिय शेतीतज्ञ श्री. रमेश जी साकरकर यांचे तीन एकर सेंद्रिय प्रक्षेत्रातील विविध पिके व २६२ जातीचे पारंपरिक देशी बियाणे उपलब्ध असलेल्या सीड बँक ला भेट दिली. यावेळी श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे प्रा दीपक बोंद्रे त्यांचे सोबत उपस्थित होते.

श्रीराम श्री रमेश जी साखरकर यांनी तज्ञांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध पारंपरिक देशी बियाणे संदर्भात माहिती प्रदान केली. तसेच जैवविविधते बाबतचे त्यांचे मॉडेल समजावून सांगितले. व आजपर्यंत केलेल्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच प्रक्षेत्रावर उपलब्ध पिकासंदर्भात सविस्तर माहिती प्रदान केली. यावेळी शास्त्रज्ञांनी श्री साखरकर यांना परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी यांनी सेंद्रिय शेती करण्यास व देशी वाणाचे जतन संगोपन करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ प्रीती सोनकांबळे, प्रा.नयना पळसपगार यांनी सेंद्रिय शेती तज्ञ श्री रमेश साकरकर व त्यांना सहकार्य करणारे प्रा.दीपक बोंद्रे यांचे उल्लेखनीय कार्य व कोरोना काळात नियमांचे पालन करून त्यांनी राबविलेल्या सेंद्रिय भाजीपाला लागवड परसबाग स्पर्धेचे आयोजन याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, बुके व विद्यापीठ डायरी देऊन यावेळी सत्कार केला. व ते राबवत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. हे कार्य विभागात जोमाने पुढे जाण्यासाठी विद्यापीठाचे प्रकल्पास सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन केले तसेच श्री रमेशजी साखरकर यांचा उत्पादित सर्व भाग विक्री संदर्भातील फॅमिली शेतकरी या संकल्पनेची शास्त्रज्ञांनी स्तुती केली व भविष्यात मोठ्या प्रमाणात ही साखळी तयार झाल्यास शेतकरी आत्महत्या होणार नाही असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

भेटीच्या यशस्वी नियोजनासाठी श्री तेजस लांजेवार सौ साखरकर श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे दीपक बोंद्रे डॉ शरद नायक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad