चांदूर रेल्वे
धामणगाव मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी शेवट च्या दिवशी मतदार संघातील तिन्ही तालुक्यात बाईक रॅली काढीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या रेकॉर्ड ब्रेक रॅली ने सिलेंडर च्या आतिश बाजीने शक्ती प्रदर्शन करीत विरोधकांची झोप उडाली आहे. तिन्ही तालुक्यात रॅली चे जंगी स्वागत करण्यात आहे.
डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या रॅली चे सुरवात मंगवारी सकाळी धामणगाव रेल्वे मतदार संघातून झाली. त्या नंतर रॅली चांदूर रेल्वे शहरात पोहचली त्या नंतर रॅली नांदगाव खंडेश्वर शहरात पोहचली. विशेष अशे की रॅली मध्ये सिने अभिनेता व महाभारतात अर्जुनाची भूमिका बजावनारे फिरोज खान पठाण असल्याने तरुणाचा चांगलाच उत्साह दिसून आला . प्रचंड घोषणा बाजी करून तिन्ही शहर दुमदुमुन गेले होते. त्या नंतर रॅली ची सांगता नांदगाव खंडेश्वर येथे जाहीर सभने झाली या वेळी अभिनेते फिरोज खान पाठन यांनी काँग्रेस व भाजप चांगलाच घना घात केला आता पर्यंत मुस्लिमाची मते घेतली मात्र सुविधा कुठल्याच दिल्या नाही. लोक प्रतीनिधी हा विकासासाठी असतो मात्र दोन्ही पक्ष कलह निर्माण करीत आहे. महाविकास पार्टी नसून नकली पार्टी आहे. असे सीने अभिनेता आणि म्हटले त्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या करीत आहे कारण शेतकऱ्यांच्या शेती मालाला भावच नाही कर्ज बाजारी झालेल्या शेतकऱ्या जवळ कर्ज चुकवण्यासाठी पैसे नसल्याने शेवटचा उपाय म्हणून आत्महत्या चा आहे. दोन्ही पक्षाने आलटून पालटून सत्ता भोगले असून या वेळी दोघानंही जनतेने हिसका दाखवावा आव्हान डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी जाहीर सभेत केले. या सभेला अॅड. संतोष पांडे, संतोष महाराज पोहरा देवी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तयबजी उपस्थित होते.