अमरावती – नुकतीच अमरावती महानगर पालिका येथे पुणे येथील आरोग्य संचालक कार्यलय येथील राज्य स्तरीय तांत्रिक अधिकारी डॉ नेहा वाघ यांनी डॉ विशाल काळे यांच्या दालनात डॉ रुपेश खडसे साथ रोग अधिकारी यांच्या सोबत सर्व आरोग्य सेवक यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली सदर बैठकिमध्ये कीटक जन्य व जलजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले डेंग्यू मलेरिया झिका गुलेन बरेन (गी बी एस) बाबत सुध्या
शासनाच्या वतीने आलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे जनते मधे जनजागृती करावी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या डेंग्यूची साथ होऊ नये म्हणून ब्रीडींग स्थान नाहीसे करावे असे सांगितले ह्या आढावा बैठकीत जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ भगत , डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी ,डॉ रुपेश खडसे साथ रोग अधिकारी , डॉ जुनेद फैजल ,हैदर अली आरोग्य निरीक्षक,बबन खंडारे , शरद सावळे , शशिकांत जयस्वाल , विकी भेंडकर , दिपाकर भरडे, वैभव देवकर,सुमित डोंगरे , रुपेश घोरे, श्रेयस नाडे , प्रतीक जोशी व इतर आरोग्य सेवक यांनी संपूर्ण शहराचा आढावा दिला