जुना धामणगाव येथील डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुलामध्ये 76 वा प्रजासत्ताक उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कॅप्टन सुनीलजी दोबाडे संयुक्त राष्ट्र महासचिव यांचे बॉडीगार्ड शालेय विद्यार्थी समुपदेशक अकोट, तसेच प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन नाजुकराव मानकर, माननीय श्री अरुण रावजी राऊत,श्री विश्वासराव केणे, संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार समन्वयीका प्रा. जया केने प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला, उपप्राचार्य दीप्ती हांडे, सीबीएससी प्राचार्य सुशांत देबनाथ उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे हस्ते या भारत मातेसाठी ज्या सुपुतांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते म्हणजे जवान त्यांच्याअमर जवान स्मारकाला पुष्पचक्र व मानवंदना पाहुण्यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. सोबतच संस्थेचे संस्थापक श्री मुकुंदरावजी पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून प्रमुख अतिथी कॅप्टन सुनीलजी डोबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिप प्रज्वलन व फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .डॉक्टर एम .के. पवार शैक्षणिक संकुलाच्या 700 बालसैनिकांनी सुंदर असे पथसंचालन सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीबीएससी प्राचार्य सुशांत देबनाथ यांनी केले .
विद्यार्थ्यांची भाषणामध्ये लूंबीनी भस्मे, नव्या युवनाते, श्रेयस भोयर ,आयशा कर्वे ,अलोक शुक्ला ,शील मेश्राम ,साहिल सुटे ,पूर्वा गोटे, विवान पवार, या विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाषणे झाली. सैनिकी पद्धतीच्या संकुलामध्ये सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत व पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी धनुरविद्या ,विविध मिल्ट्री डेमो ,रायफल शूटिंग, टेन्ट तयार करणे , पी टी डेमो ,डंबेल्स योगा ,डान्स ,कराटे डेमो, सेल्फ डिफेन्स, मल्लखांब अशा प्रकारची साहसी प्रात्यक्षिके उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे कॅप्टन सुनीलजी डोबाळे यांनी आपल्या भाषणामध्ये या राष्ट्राचा बालसैनिक हा उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी सैनिकांची आवश्यकता आहे ती तुमच्या या पवार संकुल मधून परिपूर्ण होत आहे असे मला वाटते या भारत मातेसाठी तन-मन-धन अर्पण करून देशाची सेवा करणे हे महान कार्य आहे आणि ते तुमच्या हातून घडावे यासारखे जीवनामध्ये दुसरे मोठे कार्य कोणतेही नाही म्हणून आपण उत्कृष्ट शिक्षण घेऊन चांगला भक्कम नेतृत्व शीलवान सैनिक निर्माण व्हावा हीच माझी अपेक्षा आहे असे प्रतिपादन कॅप्टन सुनीलजी डोबाळे यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांचे वाढदिवस चांगले करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता मलीये, प्रियंका शास्त्रकार यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी दासरवार यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पथ संचालनासाठी मिल्ट्री ट्रेनर हर्षल पाटील ,प्रतीक दिवेकर, आकाश महल्ले ,निखिल दामोदर ,प्रसाद जुनघरे ,तर क्रीडा शिक्षक महेश धांदे,सागर नन्नावरे,रोषणा गेडाम यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व पालक रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.