स्थानिक जुना धामणगाव–गोविंदा आला रे गोविंदा आला रे आला गोपाला देवकीनंदन गोपाला या गजरामध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात संपन्न झाली .वीर शिवबा वस्तीगृह व राजमाता वस्तीगृह यातील विद्यार्थ्यांनी रात्री जन्माष्टमीनिमित्त भजन गाऊन रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म विधिवत मंत्र उच्चाराने पूजन करण्यात आले. श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये टाकून भजन गायन झाले.
दुसऱ्या दिवशी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे व महाकालां व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमांमध्ये कृष्ण जन्म गाथा ही नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली .सोबतच श्रीकृष्ण व राधा यांची सजावट करून आलेले मुलं सहभागी झालेले होते. सुंदर गोपी गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. सोबतच मटकी डेकोरेशन व कृष्ण राधा सजावट स्पर्धा घेण्यात आली. मुले यावेळी कृष्ण सुदामा ,राधा ,सुदामा यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री शिवाजीराव पवार ,समन्वयक जया केने ,प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला ,उपप्राचार्य दीप्ती हांडे ,सीबीएससी प्राचार्य सुशांत देबनाथ उपस्थित होते .कृष्ण जन्मगाथा या नाटकीचे सादरीकरण यामध्ये कृष्ण व वासुदेव, नंदाघरी पाळणा सोहळा, श्रीकृष्णाचे बालकिडा, कृष्ण सुदामा भेट या दृश्यांनी शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मने आनंदाने भरून आली.
या नाटकीचे सादरीकरणश्री हनुमंत ठाकरे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कालावटप करण्यात आला भव्य अशा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमा सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. मटकी सजावट स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक भूमिका झोडाफीचा आला द्वितीय क्रमांक आराध्या बावेकर, तर तृतीय क्रमांक आर्या बावणेहीचा आला .गोपाळकाला विषयी सविस्तर माहिती मंजुषा विलायत कर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांकेतिक तायडे व आचल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिया कडू यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले व कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचा शेवट गोविंदा आला रे आला या गाण्याने करण्यात आला.