सुदृढ स्त्री हेच सक्षम समाजाचे प्रतीक… डॉ. कालिंदी राणे. “कळी उमलताना” या कार्यक्रमाद्वारे डॉ कालिंदी राणे यांनी केले युवतींना मोलाचे मार्गदर्शन..

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : आठ मार्च याआतंरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नगर पालिका आर्वी द्वारा स्थानिक गांधी विद्यालय आर्वी येथे युवतींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी “कळी उमलताना” या कार्यक्रमांद्वारे डॉक्टर कालिंदी राणे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आर्वी यांनी विद्यालयाच्या सर्व युवतींना सुदृढ आरोग्याबद्दल , तरुण वयात येणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबद्दल व मासिक पाळी दरम्यान घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दल मार्गदर्शन केले.

दिनांक 08 मार्च ते 14 मार्च, 2026 दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य संपूर्ण आठवड्याभर नगर परिषद आर्वी तर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले .

यातीलच एक भाग म्हणून नगर परिषदेच्या पीएमश्री गांधी विद्यालय, येथे दिनांक 12 /03/2026 रोजी किशोरवयीन मुलींसाठी “कळी उमलतांना” या विषयावर डॉ.कालिंदी राणे, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व लायन्स क्लब आर्वी च्या अध्यक्षा यांनी विद्यार्थिनीना खेळीमेळीच्या वातावरणातून अगदी सोप्या भाषेत विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले

. यावेळी आर्वीच्या नगराध्यक्षा मा. सौ.स्वाती ताई प्रकाश गुल्हाने, नगरसेविका मा. सौ.भारती दिलीप पोटफोडे, मा. सौ संपदा निलय जोशी, मा. सौ.शुभांगी प्रमोद गाठे या उपस्थित होत्या तसेच या निमित्य गांधी विद्यालय येथील सौ.ज्योती अजमिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सौ.स्मिता बिजवे यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.

यावेळी गांधी विद्यालयातील अनेक महिला शिक्षिका व युवतींनी डॉ राणे मॅडम यांना आरोग्य विषयक अनेक प्रश्न विचारून आपल्या समस्याचे निराकरण केले .

या आधी सुध्या डॉ कालिंदी राणे यांनी विदर्भातील अनेक शाळा व महाविद्यालयात जाऊन हजारो युवतींना “कळी उमलताना” या कार्यक्रमा द्वारे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

veer nayak

Google Ad