डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच द्वारा आयोजित -भिम गीताच्या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील नागरिकांचा जोरदार प्रतिसाद 

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

गायिका कु नालंदा सांगवीकर चा गित गायनाने आर्वी शहरातील व तालुक्याचा ग्रामीण भागातून आलेले नागरिक मंत्र मुग्ध

आर्वी : दिनांक 1/एप्रिल /2025 रो मंगळवार सायंकाळी 4 वाजता आर्वी शहरातील मुख्य गांधी चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भव्य भिम गीताचा संगीतमय प्रबोधनात्नात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कर्यक्रमाचे मुख्य आयोजक, डॉ राजपाल भगत माजी जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी -व दिलीप गिता शामरावजी पोटफोडे आर्वी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – यांनी बाबासाहेब सर्वांचेच यांच्या प्रयोगाला जन माणसातुन मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता तसेच भिम अनुयायी व बौद्ध बांधवांची देखील अफाट गर्दी.

या कार्यक्रमाला जमली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, डॉ राजपाल भगत यांनी केले, त्यानंतर साई परणकर इंजिनियरिंग कॉलेज चे प्राचार्य, ऍड, डॉ.रविंद्र परंनकर, प्रा. पंकजजी वाघमारे सर, प्रा. अरविंद सुरोशे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप मेंढे यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी पावसाच्या काहींश्या धारा सुरु झाल्या असता एकीकडे सर्वां समोर प्रश्न होता कि कार्यक्रम थांबणार कि काय तोच कार्यक्रमाचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी आव्हान केले कि ज्या बाबासाहेबानी आपल्या सर्वाना जाती व्यवस्थेच्या चिखलातून बाहेर काढलं त्या बाबासाहेबाचा 134 व्या जयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या वरून राज्याच्या आगमनाने तुम्ही हादरनार आहात का, यावर जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि एकही व्यक्ती, महिला अबाल वृद्ध लहान मुलं या अफाट जनसागरातुन उठला नाही, नंतर वातावरण निवळलं आणि बाबासाहेबाचा नावाचा जयघोष करत मोठया उत्साहात हा कार्यक्रम नियोजित वेळे पर्यंत चालला या कार्यक्रमाचा गायिका कु नालंदा सांगवीकर व संच नांदेड यांनी उपस्थित नागरिकांना मंत्र मुग्ध केले तर योगेश राय यांनी दिलेल्या उत्कृष्ट साउंड, कलर्स ग्राफिक्स ची स्क्रीन व बबलू खडसे यांनी केलेली स्टेज व्यवस्था ही देखील डोळे दिपवणारी होती, कार्यक्रमाला प्रामुख्याने धम्म प्रचारक सुरेश भिवगडे, समता सैनिक दलाचे प्रमोद चोरपगार प्रवीणजी काळे, जयंती उत्सव समितीचे दीपकजी ढोणे, प्रवीणजी मनवर, नितीनजी मनवर, भारती बन्सोड, अशोक धानोरकर, प्रफुल सोमकुवर, दिलीप बोरकर, रेखा वानखडे, भारती पोटफोडे, प्रा. विजया मुळे, मधुकरराव साबळे, दुपारे गुरुजी, फुलाबाई भगत, देवकाबाई सौदागर, गौतम कुंभारे, संदीप सरोदे, दर्पण टोकसे, शुभांगी भिवगडे, प्रज्ञा शील ग्रुप च्या सर्व सदस्यां, जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, राजेश शिरघरे मित्र परिवार,आदर्श ग्रुप चे सर्व सदस्य, भिम टायगर सेना, व विविध सामाजिक संघटना व पक्षाचे चे पदाधिकारी व सर्व जातीधर्माच्या नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती होती

veer nayak

Google Ad