स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

0
109
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे 

दरवर्षी 14 एप्रिल रोजी लोक आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने आणि त्यांच्या पद्धतीने साजरी करतात. डॉ. आंबेडकर जयंती समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणूनही ओळखली जाते. श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा आणि शाळेचे सर्व शिक्षकगण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, आयोजन समिती आणि ब्ल्यू हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.

veer nayak

Google Ad