चांदुर रेल्वे –
अंजनसिंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची महत्वाची बैठक लुंबीनी बुद्ध विहारात पार पडली.
या बैठीकीला धम्म प्रशिक्षण अभियानाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष मा. बंडूभाऊ आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच महिला प्रमुख पपीताताई मनोहरे, मुदुलाताई हेरोडे, पद्धमाकरजी वहिले, नितीनजी टाले, राजाभाऊ मनोहरे, आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वेची कार्यकारणी तयार करण्यात आली. धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख, म्हणून ज्योतीताई मेश्राम. उपप्रमुख मनोरमाताई वहिले, सचिव प्रतिभाताई डोंगरे धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष इंद्रपालभाऊ रंगारी उपाध्यक्ष हेमराज भाऊ तुपसुंदरे तालुका संघटक गजानन गवई ,सचिव रमेशभाऊ काळे ,सहसचिव पवनभाऊ भोगे यांची निवड करण्यात आली. चांदुर रेल्वे तालुका महिला प्रमुख अश्विनीताई घोडेस्वार, यांची निवड करण्यात आली. या वेळी अरुणाताई आठवले, लताताई बागडे, ज्योतीताई मेश्राम, अश्विनीताई घोडेस्वार आणि अनेक धम्म पुरुष बांधव उपस्थित होते. या बैठीकित चांदुर रेल्वे येथे 10 एप्रिल रोजी एक दिवशीय धम्म शिबीर घेण्याचे ठरविण्यात आले.
आणि अमरावती जिल्हात सुद्धा तीन दिवशीय धम्म शिबीर घेण्यात येईल असे अमरावती जिल्हाचे अध्यक्ष मा. बंडूभाऊ आठवले कडून या बैठकीत
सांगण्यात आले. ह्या बैठकीमद्ये नवीन कार्यक्रमाची आखणी करून सर्व विषयावर चेर्चा करण्यात आली.