जिल्ह्यातील वाळूघाट लिलावास मोठा प्रतिसाद

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

1 कोटीच्या बदल्यात सर्वोच्च 7 कोटी किंमत

अमरावती, दि. 10 (जिमाका) : महसूल व वनविभागाने वाळू निर्गती धोरण जाहिर केले आहे. वाळू लिलाव धोरणातील तरतुदीनुसार सन 2025-26 या वर्षाकरीता जिल्ह्यातील 33 वाळूघाटांकरीता ई-निविदा व ई-लिलावाच्या प्रथम फेरीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी लिलावामध्ये 33 पैकी तांत्रिकदृष्ट्या पात्र 8 वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला. या लिलावामध्ये 8 वाळू घाटांची हातची किंमत ही केवळ 1 कोटी असतानाही लिलावामध्ये एकुण 7 कोटी सर्वोच्च किंमत प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकारेपणे अंमलबजावणी करुन कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यात महसूल यंत्रणेमार्फत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीच्या 264 कारवाया करुन दंडाची कारवाई केली आहे. सदर लिलावाची घाटनिहाय प्रक्रिया राबविल्यामुळे व परराज्यातुन येणारी वाळुची वाहतुक बंद केल्यामुळे सदर वाळू लिलावास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून शासकीय वसुली वाढण्यास मोलाची भर पडली आहे.

एकुण 33 वाळू घाटांपैकी लिलाव झालेले 8 वाळूगट वगळता उर्वरित 25 वाळूघाटांची लिलावाची दुसरी फेरीची प्रक्रिया ऑनलाईनरित्या mahatender.gov.in या शासन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर प्रक्रिया ही दि. 10/11/2025 या कालावधीपासून ते दि. 20/11/2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. सदर लिलाव प्रक्रियेमध्ये निविदाधारक दि. 10 नोव्हेंबर ते दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा अर्ज दाखल करु शकतील. दि. 20 नोव्हेबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्यक्षरित्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. यातही सकारात्मकदृष्ट्या विचार करुन व कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन इच्छुक लिलावधारकांनी लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad