यवतमाळ -: महिलांना स्वयंरोजगारातून सक्षम करण्याकरिता नील बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने “गाव तिथे महिला प्रशिक्षण” योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुवर्णा चंदनखेडे तसेच सचिव ओमप्रकाश सोनटक्के यांच्या पुढाकाराने यवतमाळातील संविधान चौकातील लॉर्ड बुद्धा कार्यालयात दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ.अंजली गवार्ले ह्या होत्या,तर प्रमुख अतिथी आदित्य बिर्ला कॅपिटलचे ॲडव्हायझर प्रवीण घोडके,लोकनायक मीडियाचे संपादक सुकांत वंजारी,अमोल गुप्तवार, पोलीस पाटील सतीश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा चंदनखेडे यांनी आपल्या प्रास्तविकातून संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की आज सरकारच्या वतीने महिला सक्षमीकरणाकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
मात्र त्या उपक्रमातून प्रत्येकच महिलांना सक्षम करता येईल असे नाही. यामुळे महिलांना रोजगार निर्मिती व्हावी तसेच आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व मुलाबाळांच्या शिक्षणासाठी हातभार व्हावा.याकरिता शिलाई मशीन वाटप करण्यात आले असून मी सुद्धा एकल महिला आहे. एकटी महिला असल्यावर कुटुंबाची काय जबाबदारी असते याचा मला दांडगा अनुभव असून महिलांसाठी काहीतरी करण्याची कार्यक्षमता माझ्यात निर्माण व्हावी,करिता हा एक छोटासा प्रयत्न आमच्या नील बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.यापुढेही महिलांकरिता सक्षमीकरणाच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना सुकांत वंजारी म्हणाले की नील बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा देत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा तसेच आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागावा.या उद्देशाने या शिलाई मशीनचे वाटप केले असून महिलांना आता घरबसल्या रोजगार मिळणार आहे.आपल्या कुटुंबाच्या व मुलांच्या शिक्षणाच्या गरजा त्यांना भागवता येईल अशाच प्रकारे भविष्यातही संस्थेने विविध सामाजिक उपक्रमासह महिला सक्षमीकरणाकरिता कार्यरत रहावे असे सांगितले तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना डॉ.अंजली गवार्ले म्हणाल्या की आज महिला कुठेच कमी नाही,मात्र आपल्या कुटुंबासाठी व मुलांच्या भविष्याकरिता पतीच्या खांद्याला खांदा लावून या शिलाई मशीनच्या स्वयंरोजगारातून हातभार लावता येईल तसेच त्यांनी यावेळी आव्हान केले की गोरगरीब तसेच गरजू महिलांना गवारले हॉस्पिटलच्या वतीने निशुल्क तपासणी नियमित केल्या जात असून नील बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शंभर महिलांना निशुल्क तपासणी कुपन वाटप करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.नीता भारत बोडे,सोनू किशोर पाचभाई, मंजुषा विनोद डोये,कल्पना विनोद धागी,आचल राजू विळटकर,शिंदू बोडे,पूनम निलेश धागी,नेहा प्रफुल जोगी,किरण महेंद्र जोगी,स्नेहल पायघन,पूजा बाळकृष्ण कासार,कल्पना संतोष कचरे,सविता गणपत हिवरकर,सुलभा शंकर आडे ,ललिता अजिटकर,इंदू सुरेश गवते,सविता अनिल राजूरकर,संगीता मारोती धोटेकर,सुषमा प्रवीण ढेमरे,स्नेहा मंगेश चव्हाण या महिलांना शिलाई मशीन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा रामटेके यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नील बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा चंदनखेडे, सचिव ओम प्रकाश सोनटक्के तसेच उमेश मडावी यांनी परिश्रम घेतले.