धामणगाव रेल्वे.
श्री.भाऊराव गाढवे से. नि. प्राचार्य तथा अध्यक्ष, धनगर कर्मचारी संघटना धामणगाव यांचे अध्यक्षतेखाली तर सत्कार मुर्ती मा. श्री आमदार प्रतापदादा अडसड धामणगाव रे, श्री. प्रदीपभाऊ बांबल माजी सभापती पं. स. तिवसा, श्री. गोपालराव थोटे पो. पा. भिल्ली,जुना धामणगाव माजी उपसरपंच शामभाऊ गंधे, ग्रा. पं. सदस्या सौ. महात्मे ताई, जेष्ठ महिला सौ. सावलकर काकू यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार मा. श्री. प्रताप दादा अडसड यांचा शालश्रीफळ, पुष्पगुच्छ व अहिल्यामातेची प्रतिमा देवून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सोबतच सेवानिवृत्त कर्मचारी सौ. वनमालाताई कचरे, श्री.संजयजी जोगी, दादारावजी निखार व संघटनेचे उपाध्यक्ष श्री. गोवर्धनजी मुंदाने यांचासुद्धा सत्कार करण्यात आला.
त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे अनुषंगाने तिनसे दिव्यांची मांडलेली आरास कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तसेच रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचेसुद्धा आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला जुनाधामणगाव, मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, भिल्ली व धामणगावतील विद्यार्थी, तरूण युवक-युवती व जेष्ठ समाज बंधु-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रुपाली होटे यांनी तर संचालन संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश थोटे व आभार प्रदर्शन श्री. पवन लांबाडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना घेवून करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता मधुकर निखार, ओंकारराव उंदरे, मनोज धवने, आगरकर सर, चारथळ सर, पंकज धामसे, प्रकाशराव बुंधाडे, सौ. वृशाली सावलकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.