सद् धम्म प्रचार केंद्र महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने उसळगव्हाण येथील केंद्राच्या वतीने पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये ध्यान साधना, मैत्री भावना, छडायतन, नामरूप,कार्यकारण भावाचा सिद्धांत,अष्टांगिक मार्ग, बुद्धाला बुद्धत्व कसे प्राप्त झाले, पंचशील ध्वज निर्मिती कशी झाली, बुद्धकालीन योगासने तसेच ध्यानाचा सराव व या सर्व गोष्टी प्रवचनाद्वारे शिबिरामध्ये शिकविला गेल्या या शिबिरामध्ये अमरावती,पुलगाव,नागपूर, वर्धा मुंबई, पुणे या ठिकाणाहून शिबिरार्थी दाखल झाले होते.
सदर उसळगव्हाण या केंद्रावर वर्षी भर शिबिराचे आयोजन केल्याजाते. सगळीकडे आज मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता माजत आहे त्यामुळे येणार हा नवतरुण व्यसनाच्या आहारी जात आहे कुठेतरी भरकटला जात आहे त्याला योग्य दिशा दाखवण्याचे काम प्रामुख्याने सद् धम्म प्रचार केंद्र गेल्या 35 वर्षापासून सातत्याने करत आहे त्यामुळे येणार तरुण याकडे अधिक वाढला पाहिजे त्यासाठी या शिबिराचे आयोजन असते व या शिबिरामध्ये माणसाचे माणूस पण काय आहे हे समजावल्या जाते असे मत आचार्य बी.सी.वानखडे यांनी यावेळी मांडले.
या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून बी.सी.वानखडे साहेब, स्वयंम ढोणे, सुधीर वानखडे हे या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते सुधीर वानखेडे यांनी संपूर्ण शिबिराची धुरा सांभाळली सोबतच त्यांनी या शिबिराला विशेष मार्गदर्शन पाचही दिवस केले शेवटच्या समारोपय दिवशी मंगल मैत्री त्या ठिकाणी करण्यात आली या शिबिराला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव उपासिका असे हजर होते पाच दिवसीय शिबिर यशस्वी करण्याकरिता या सर्व अथक परिश्रम घेतले , विवेक वाहूर वाघ, कनिष्क रोडगे,सरिता पळसपगार,अस्मिता मेश्राम, प्रज्ञा इंगोले,गोविंद इंगोले, सरिता वैद्य, प्रवरजित भगत, स्मिता नगराळे, कांताबाई वानखडे