धामणगाव रेल्वे :-
कोट्यावधी भक्तांचे आराध्य खाटू नरेश श्याम बाबा यांच्या पावन अखंड ज्योत यात्रेचे आगमन खाटूधाम राजस्थान येथून होत असून ही यात्रा बारा ज्योतिलिंग चे दर्शन करीत कन्याकुमारी येथे पोहोचून तेथे भक्तीभावात या यात्रेचे समापन करण्यात येणार आहे.
यात्रेचे संयोजक व श्याम भक्त जयपूर येथील गिरीराज शरणदास यांच्या पुढाकारात आयोजित ही अखंड ज्योत यात्रा आज बुधवार दिनांक 29 मे रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानीय श्री मारुती देवस्थान, टिळक चौक येथे पोहोचणार आहे. तेथे आरती व पूजन केल्यानंतर असंख्य श्याम भक्तांच्या समवेत निशान यात्रेच्या समवेत ही अखंड ज्योत यात्रा गावातील मुख्य मागार्ने जे बी पार्क येथील श्री बालाजी खाटूश्याम मंदिरात पोहचणार आहे. येथे भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्याम भक्तांनी या अखंड ज्योत यात्रेत व भजन उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.