धामणगावच्या श्रीबालाजी-खाटुश्याम मंदिरात रंगरंगीला फागुन मेला ( यात्रा) 6 दिवसीय उत्सवात विविध धार्मिक अनुष्ठान

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे –

 लाखो-लाख भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाटु नरेश श्री श्यामबाबांचा प्रगटोत्सव साजरा करण्यासाठी रंगरंगीला फागुन मेळ्याच्या 8 व्या वर्षाच्या निमित्ताने विविध धार्मिक अनुष्ठान ,मनोरंजनासाठी विविध झूले, विविध चविष्ट पदार्थांचे स्टॉल, धामणगाव येथील जे.बी.पार्क मध्ये श्रीबालाजी-खाटुश्याम मंदिरात सोमवार 18 मार्च ते शनिवार 23 मार्च या कालावधीत घरगुती वस्तूंचे स्टॉल आणि दुकाने असलेल्या या बहुप्रतिक्षित जत्रेत भजन, कीर्तन आणि प्रसार स्वरूपात लंगर देखील असेल.

कलियुग अवतारी श्रीश्यामबाबांचा रंगरंगीला फागुन मेला स्थानिक श्री बालाजी-खाटुश्याम मंदिरात फागुन शुक्ल 9 सोमवार, 18 मार्च रोजी सुरू होणार आहे, फागुन शुक्ल रोजी अतुल गिंदोडिया, जालना यांच्याकडून राजस्थानमधील रुणिचा येथे स्थित बाबा रामदेव यांचे जम्मा जागरण सादर होणार आहे, फाल्गुन शुक्ल 10 ,मंगळवार, दिनांक १९ मार्च ला मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका कु. ऋतू शर्मा यांच्या वाणीतून नानीबाईची मायरा होईल, फागुन शुक्ल ११, बुधवार, २० मार्च रोजी सकाळी जे बी जीन येथुन लाकडाने निर्मित हाताने ओढणाऱ्या रथावर विराजमान श्री श्यामबाबांच्या मूर्तीची भव्य निशान यात्रा (शोभायात्रा ) गांधी चौक, मेन लाईन, सिनेमा चौक , टिळक चौक, शास्त्री चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मार्गे जे.बी.पार्क येथील श्री बालाजी-खाटुश्याम मंदिरात पोहोचेल, ज्यामध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले शेकडो भाविक हातात श्रीश्याम ध्वजा घेऊन सहभागी होतील.संध्याकाळी ७ वाजता मंदिरातील श्री श्यामबाबांच्या मूर्तीची रंगीबेरंगी फुलांनी आरास केली जाईल तसेच दिव्य पावन ज्योतीचे दर्शनासह अकोला निवासी चंद्रकांत तिवारी यांचे “कीर्तन की है रात” ही श्याम भजन संध्या. फागुन शुक्ल 12, गुरुवार, 21 मार्च, सायंकाळी 7 वाजता कुमार योगेश, नागपूर यांच्या श्रवणीय आवाजात “अरजी लगलो श्याम से” श्याम भजन संध्या. फागुन शुक्ल 13, शुक्रवार 22 मार्च ला उत्तर प्रदेश बरेलीच्या प्रसिद्ध भजन गायिका कु. अपर्णा मिश्रा आणि मास्टर अनंत मिश्रा यांची ” मिलेंगे श्याम कीर्तन में “, विशाल श्याम भजन संध्येची प्रस्तुती फागुन शुक्ल 14, शनिवार 23 मार्च सायंकाळी 7 वाजता रंगीरंगीला फागुन मेला यात्रेच्या समापना निमीत्त. “होली का रसिया श्याम सलोना” ही भव्य दिव्य श्याम भजन संध्या सौ. सुनीता गोयल, हांसी (हरीयाणा ) यांच्या सुमधुरवाणी द्वारे सादर होईल 

 या रंगरंगीला फागुन मेला चे प्रमुख आकर्षण मंदिर परिसरात नवनिर्मीत “प्रेरणाकुंज” (वाटीका) चे लोकार्पण होईल या वाटीकेत आकर्षक विद्युत रोषणाई चे फवारे, विविध फुलझाडे व हीरवळीचे लॉन हे वैशिष्ट्य आहे या वाटीकेने या परिसराला अधिकच वैवीधता प्राप्त होणार आहे अश्या या रंगरंगीला फागुन मेला (यात्रा) च्या तैयारी साठी श्री बालाजी -खाटुश्याम सेवा समितीचे सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहे सोबतच या यात्रेत सहभागी होऊन सर्व धर्म प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

veer nayak

Google Ad