धामणगावात एकाच दिवसांत १ हजार ८ प्रकरणाला मंजुरात संगायो समितीची बैठक

0
272
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत एकाच दिवशी १ हजार ८ प्रकरणाला मंजुरी देण्यात आली

समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव राळेकर यांचे अध्यक्षतेखाली रोजी संजय गांधी योजना विभाग, तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे पार पडली असून त्यामध्ये एकूण 1008 प्रकरणांना मंजूरी प्रदान करण्यात आली,

संजय गांधी योजना विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना राबविण्यात येते त्याद्वारा पात्र लाभार्थी यांना शासनाकडून दरमहा १हजार ५०० इतके अनुदान वितरीत करण्यात येते. सदर बैठकीमध्ये संजय गांधी योजनेची ५४२प्रकरणे तर श्रावणबाळ योजनेची ४६६ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून ५९ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. बैठकीत अपूर्ण कागदपत्रांमूळे स्थगीत ठेवण्यात आलेल्या प्रकरणांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करुन पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष राळेकर आवाहन केले आहे. यावेळी नंदकिशोर ढोले, अरुणा मारोडकर नरेंद्र ढाले, सचिन बमनोटे, प्रकाश बीरे अशोक वानखेडे शाम घाटे सदस्य उपस्थित होते तर समितीचे कामकाज हेमंत पाटील सचिव तथा तहसीलदार संगायो यांनी पार पाडले. याकामी प्रीती कन्नाके, अव्वल कारकून, नरेंद्र इंगळे सुनिल कन्नमवार महसूल सहायक अमोल तिघरे संगणक ऑपरेटर यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad