श्रावण महीण्याच्या पवित्र सणानिमित्त जगप्रसिद्ध कथावाचक संत श्री जयप्रकाशजी महाराज यांच्या वाणीमधून कथा दि. २५ ते २७ जुलै पर्यंत आयोजन…
धामणगाव रेल्वे,
धामणगाव या अध्यात्मनगरीत इतिहासात पहिल्यांदाच करोडोंचे श्रद्धास्थान राजस्थान रामदेवरा ऋणीच्याचे श्री रामदेवबाबा यांच्या जीवनावरील अमृत कथा महोत्सवाचे आयोजन श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती, धामणगाव रेल्वे च्या वतीने दि.२५ ते २७ जुलै २०२५ या तीन दिवसात करण्यात आलेले आहे.
ही कथा जगातील प्रसिद्ध कोलकत्ता येथील श्री रामदेव बाबा जीवनावरील कथावाचक पूज्य संत श्री जयप्रकाशजी महाराज यांच्या वाणीतून होणार आहे.
दररोज दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोही रिसोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कथेमध्ये पहिल्या दिवशी श्री रामदेव बाबांचा जन्मोत्सव दुसऱ्या दिवशी बाबांचा लिला उत्सव तसेच रविवार दिनांक २७ जुलै ला बाबांचा ब्यावला उत्सव होणार आहे.
धामणगाव शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या आध्यात्मिक,धार्मिक व रामदेव बाबांच्या जीवनावरील अमृत कथा महोत्सवास जिल्ह्यातील तसेच परिसरातील श्री रामदेव बाबा भक्त परिवारांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंती आयोजक श्री परशुराम महिला सेवा समिती, श्री परशुराम सेवा समिती, धामणगाव रेल्वे तर्फे करण्यात आलेली आहे.