धामणगाव रेल्वे : बुधवार बाजारात बाहेरगावाहून आलेल्या फळगाड्यांचा अतिक्रमणाचा कहर – मोटारसायकल तर सोडाच, पायी चालणेसुद्धा झाले कठीण!

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – बुधवार बाजारात बाहेरगावाहून येणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या गाड्यांनी अक्षरशः रस्ते ठप्प केले आहेत. बाजारपेठेत इतक्या गाड्या रांगेत उभ्या राहतात की मोटारसायकलवरून जाणं तर दूरच, पायी चालणंसुद्धा कठीण झालं आहे.

स्थानिक दुकानदार आणि फेरीवाल्यांचा व्यापार थंडावला असून ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर गाड्यांचा कब्जा असल्याने बाजारपेठेत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यापाऱ्यांचा आरोप आहे की, बाहेरगावाहून येणाऱ्या या गाड्यांमुळे स्थानिकांना व्यवसायाची संधी मिळत नाही आणि प्रशासन मात्र डोळेझाक करून बसले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने कारवाई झाली नाही, तर आम्हाला उग्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.

आता नगर परिषदेने या गंभीर प्रश्नावर कडक पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

veer nayak

Google Ad