धामणगाव रेल्वे (ता. अमरावती) – समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार व विषमतेविरोधात लढा देण्यासाठी कार्यरत असलेल्या महिला मुक्ती मोर्चा या संस्थेच्या वतीने सुनिता प्रविण जगताप (रा. पाटील पुरा, दत्तापूर) यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोक खरात व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संगिताताई वाघ यांच्या स्वाक्षरीने दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आली.
या नियुक्तीमुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील महिलांचे प्रश्न, अन्यायाविरोधातील लढा आणि संघटन अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
✨ “आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा” असे शुभेच्छा संदेशही संस्थेच्या वतीने देण्यात आले.